no images were found
गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
आमदार गोपीचंद पडळकर हे रात्री उशिरा सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा सत्कार ठेवण्यात आला होता.सत्कार समारंभात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत एकेरी भाषेत उल्लेख करत जहरी टीका केली.
जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी हे संस्थान होळकरांचे आहे. पवारांचा या संस्थानाशी काहीही संबंध नाही. होळकरांनी या जेजुरी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे,ही होळकरांची जहागिरी आहे, असे पडळकर यांनी सांगितलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत इतका कळवळा होता तर शरद पवार हे यंदाच्या वर्षी चौंडी येथे का आले नाहीत.शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तसेच केंद्रात अनेक वर्षे सत्तेत होते,त्यावेळी चौंडी त्यांना आठवली नाही ,अशी टीका करत गोपीचंद पडळकर शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, रोहित पवार हे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात. त्यांच्या दावणीला किती कोंबडं असतात, हे तुला माहिती नाही का माकडा?, असे म्हणत पडळकर यांनी रोहित पवार यांचा माकड असा उल्लेख केला. धनगर समाज काय उपाशी आहे, तुम्ही प्रसाद वाटताय. धनगरांच्या घरी पाहुणे आले तरी कोंबड कापतात. तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोला पडळकरांनी रोहित पवारांना लगावला.