
no images were found
शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन
कोल्हापूर : “मातोश्री” ला लागलेल्या ग्रहणाचे मुख्य कारण असलेले संजय राऊत महाराष्ट्र राज्याची संस्कृती आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार विसरले आहेत. कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून, उरला – सुरला गट संपविण्याचा एकप्रकारे विडा उचललेले खासदार संजय राऊत हे पूर्णत: खचून गेले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची व्यक्तव्ये आणि असभ्य वर्तन पाहता ते महाराष्ट्राचे नागरिक असल्याचे भान त्यांना नाही. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी बाबत त्यांचे असभ्य वर्तन संपूर्ण महाराष्ट्र पाहत असून, त्यांनी वेळीच आपल्या असभ्य कृतीला लगाम घालावा, अन्यथा शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचे शिवसैनिक संजय राऊत यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, अशा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिला. खासदार संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर थुंकण्याची निंदनीय कृती केली. याविरोधात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन केले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “संजय राऊत कोण रे पायताण मारा दोन रे” अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, संजय राऊत हे वाचाळवीर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या राज्याच्या विधीमंडळाबाबतही अवमान कारक वक्तव्य केले आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी तीन – चार लाख मतदार निवडून देतात त्यांचा मानसन्मान न ठेवता संजय राऊत थुंकण्याचा प्रकार करून लोकप्रतिनिधी सोबतच त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा, मतदारांचा अवमान करत आहेत. त्यांच्या वाचाळविरतेला जनता कंटाळली असून, लोकप्रतिनिधी असो वा मतदार वा विधीमंडळ यांचा अवमान करणाऱ्या अशा असभ्य व्यक्तीवर मतदारच थुंकतील, असा इशाराही दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, प्रा.शिवाजी पाटील, किशोर घाटगे, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, समन्वयक सुनील जाधव, कृष्णात पोवार, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, युवा सेना जिल्हा संपर्कअधिकारी प्रसाद चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी चेतन शिंदे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, कपिल केसरकर, दीपक चव्हाण, कपिलसरनाईक, विपुल भंडारे, अभिजीत गजगेश्वर, सुरेश माने, गणेश रांगणेकर, राजू काझी, अमित चव्हाण, निलेश हंकारे, मंदार तपकिरे, रियाज बागवान आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.