no images were found
भाजपाच्या वतीने विशेष जनसंपर्क अभियान
कोल्हापूर : पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 30 मे, 2023 रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 30 मे ते 30 जून, 2023 या कालावधीत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘विशेष जनसंपर्क अभियान संपन्न होत असून जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र आणि बूथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आज भाजपा जिल्हा कार्यालयात मोदी @ 9 कार्यक्रमांच्या विविध कार्यक्रम जिल्ह्यात बूथ स्तरावर राबवण्याबाबत भाजपा पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत असून भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे अधिक मजबूत करून आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. या अभियानात लोकसभा व विधानसभा मतदारसंघात बूथ स्तरावर व्यापक जनसंपर्क, लाभार्थी संपर्क, समाजातील विविध घटकांशी संपर्क, ज्येष्ठ कार्यकत्यांशी संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोमाने करावे असे आवाहन याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे हे होते. याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या या बैठकीत जिल्ह्यामध्ये लोकसभा स्तरावर संपर्क अभियान, पत्रकार परिषद, बुद्धीजीवी संमेलन, सोशल मिडीया वरील प्रभावशाली व्यक्तींचा मेळावा, व्यापारी संमेलन, विकास तीर्थ, जेष्ठ कार्यकर्त्यांसमवेत संवाद, संयुक्त मोर्चा संमेलन लाभार्थी संमेलन, योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी- व्हिडीओ कॉन्फरन्स, घरोघरी संपर्क अशा पद्धतीचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आहे.
संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, अशोक देसाई, हेमंत आराध्ये,अलकेश कांदळकर, प्रा.सुनिल मगदूम,भगवान काटे, अजित ठाणेकर,डॉ.के.एन.पाटील, डॉ. आनंद गुरव, विजय खाडे,गणेश देसाई, विजय खाडे आदी उपस्थित होते.