no images were found
कृष्णा, पंचगंगा काठची दीड लाख एकराहून अधिक काळीभोर शेती विनापीक बनली आहे :- राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर
शिरोळ प्रतिनिधी :- कृष्णा, पंचगंगा काठची दीड लाख एकराहून अधिक काळीभोर शेती विनापीक बनली आहे. उत्पादनाचा अति हव्यास आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने ही दुर्दशा उद्भवली आहे. अशी जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न शेतकरी, शासन, कृषी शास्त्रज्ञ, शेती अभ्यासक, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होत असल्याचे राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिरोळ येथे व्यक्त केले.
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी नापीक जमिनी पुन्हा पिकाऊ करण्याच्या दृष्टीने आवश्यक योजनांची व्यापक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून, शिरोळ तालुक्यासह राज्यातील इतर तालुक्यातील क्षारपड जमिनींचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिले. आज क्षीरसागर यांनी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची पाहणी केली.