no images were found
सारा अली खान स्ट्रीक्स शाइन हेअर सीरमचा नवीन चेहरा
“वॉलनट ऑइल आणि ई जीवनसत्त्वाने समृद्ध स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम आजच्या पिढीतील प्रत्येकीच्या केसाला देणार बॉलिवूडचे वलय आणि आकर्षक चमक — गुंता जाणार, मुलायम चमक येणार
मुंबई– स्ट्रीक्स या हायजिनिक रिसर्च इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या (एचआरआयपीएल) ब्रॅण्डने आपल्या स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम या उत्पादनाचा चेहरा म्हणून बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी अभिनेत्री सारा अली खानशी करार केला आहे. ‘फ्रिझ गॉन, स्मूथ शाइन ऑन’ या टीव्हीसीद्वारे ब्रॅण्डने साराच्या गमतीशीर, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतानाच हे सीरम काही सेकंदात गुंता सोडवून केस कसे सुळसुळीत, चमकदार, मोकळे करते हेही दाखवले आहे.
चैतन्याने सळसळणारे व्यक्तिमत्व, ताजीतवानी मोहकता आणि शैलीची सहज समज या गुणांमुळे सारा अली खानमध्ये स्ट्रीक्सच्या आपल्या ग्राहकांना आत्मविश्वासाने ‘चमकण्यात’ मदत करण्याच्या तत्त्वाचे प्रतिबिंब दिसते. नैसर्गिक दिमाख आणि सर्वांना आपलीशी वाटणारी छबी यांमुळे ती स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम या केसाचा कायापालट करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्पादनाचा चेहरा म्हणून चपखल शोभून दिसते. हा सहयोग साजरा करण्यासाठी स्ट्रीक्सने साराचा सहभाग असलेल्या ‘फ्रिझ गॉन, स्मूथ शाइन ऑन’ या आपल्या नवीन टीव्हीसी अभियानाचाही शुभारंभ केला आहे. गच्चीवर जोरात वाहणारा वारा आणि गर्दीतून करावे लागणारे प्रवास यांसारखे दैनंदिन क्षण या जाहिरातीत टिपण्यात आले आहेत, अशा प्रसंगांमध्ये केसात अनपेक्षितपणे खूप गुंता होतो आणि स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम लावले असता काही सेकंदात केस मुलायम, चमकदार आणि कॅमेरासाठी सज्ज कसे होतात हे या जाहिरातीत दाखवले आहे. केसातील गुंता तत्काळ सोडवून ते चमकदार करण्याची या उत्पादनाची क्षमता जाहिरातीमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळेच सदैव छान दिसण्याची आणि चमकत राहण्याची इच्छा असलेल्या स्त्रियांसाठी हे उत्पादन ‘गो-टू’ पर्याय कसे ठरते यावरही भर देण्यात आला आहे.
एचआरआयपीएलच्या मार्केटिंग विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष प्रियांका पुरी म्हणाल्या, “स्ट्रीक्स चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी सारा अली खान हा परिपूर्ण चेहरा आहे. या चळवळीत केसाची काळजी घेणे हे केवळ उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर आत्मविश्वासासाठी व दैनंदिन शैलीसाठी ते आवश्यक आहे. केस गुंतण्याचा त्रास प्रत्येकीला कुठेही होऊ शकतो आणि स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम हा गुंत्यांचे रूपांतर काही क्षणात मुलायम, चमकदार, कॅमेरासाठी सज्ज केसामध्ये करणारे एक सोपे, दैनंदिन उत्पादन आहे ही कल्पना ‘फ्रिझ गॉन, स्मूथ शाइन ऑन’ या घोषवाक्याद्वारे प्रत्यक्षात येते. या कथेत सारा जान आणत असल्यामुळे देशभरात आत्मविश्वास व शैलीच्या जोरावर दररोज चमकत राहण्याच्या नवीन लाटेला प्रेरणा देण्यास सज्ज झालो आहोत.”
सारा अली खान या सहयोगाबद्दल उत्साह व्यक्त करत म्हणाली, “मी स्ट्रीक्स परिवारात सामील होण्यासाठी खरोखर उत्सुक आहे. माझ्यासाठी केस केवळ रचनेपुरते नाहीत, तर तो आत्मविश्वासाचा व स्वयंअभिव्यक्तीचा भाग आहे. स्ट्रीक्स शाइन हेअर सीरमची मला खूप आवडणारी गोष्ट म्हणजे हे सीरम केसाला तत्काळ मुलायम आणि चमकदार करते आणि ते लावणाऱ्या व्यक्तीला एक परिपूर्ण रूप देते.”
वॉलनट ऑइल (अक्रोडाचे तेल) आणि ई जीवनसत्त्वाने समृद्ध असे स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम हे उत्पादन तत्काळ चमक देण्यासाठी, मुलायमपणा आणण्यासाठी तसेच गुंता सोडवण्यासाठी ओळखले जाते. हे लावणाऱ्या व्यक्तीला दररोज सुंदर दिसण्याची व वाटण्याची क्षमता हे उत्पादन देते. मग ती व्यक्ती सहज म्हणून फिरायला गेलेली असो किंवा एखाद्या वलंयाकित समारंभाला गेलेली असो.
स्ट्रीक्स शाइन हेअर सीरम हे देशभरातील सर्व मोठ्या दुकानांमध्ये ४५ मिली, १०० मिली आणि २०० मिली अशा सोयीस्कर व परवडण्याजोग्या पॅक्समध्ये उपलब्ध आहे. स्ट्रीक्स हेअर सीरम श्रेणीमध्ये फ्रिझ कंट्रोल हेअर सीरम, हीट प्रोटेक्ट स्प्रे आणि मॉइश्चर बूस्ट स्प्रे आदी उत्पादनेही उपलब्ध आहेत. केसाच्या वेगवेगळ्या गरजांवर ही उत्पादने व्यक्तीनुरूप उपाय