Home शैक्षणिक डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीला पेटंट

डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीला पेटंट

0 second read
0
0
43

no images were found

डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीला पेटंट

कोल्हापूर( प्रतिनिधी ): डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला नुकतीच मान्यता मिळाली आहे. ऊर्जा साठवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या ‘अमोर्फोस निकेल फॉस्फेट फिल्म्स’ बनविण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी हे पेटंट जाहीर झाले आहे.
रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी अर्ज केला होता. हे पेटंट २८ एप्रिल २०२३ रोजी संशोधकांच्या नावे मंजूर केले गेले. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकीची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल. या संदर्भात संस्थेचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी माहिती देताना सांगितले कि, “डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे २० वे पेटंट आहे. विद्यापीठ आणि संशोधकांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी आहे. मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, “सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या ‘थिन फिल्म्स’ ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या विद्युत घट तसेच सुपरकपॅसिटर आणि बॅटरी मध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व डॉ. उमाकांत पाटील यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी डॉ. सचिन पुजारी आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…