no images were found
खासगी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीस प्रतिबंध
कोल्हापूर : प्रवाशांनी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 8999803595 या व्हॉटसअप क्रमांकावर व rto.09-mh@mah.gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी तसेच dycommr.ent2@gmail.com या ई-मेल आयडीवरही आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतूकीचे सद्य स्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासन निर्णय जारी करुन निश्चित करण्यात आले आहेत.
दि. 30 जून 2023 पर्यंत खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. गर्दीच्या हंगामात खासगी बस मालकाकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रती कि.मी. भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याचे खातरजमा करण्यात येणार आहे. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतूकदारावर मोटार वाहन कायदयान्वये कडक कारवाई करण्यात येईल.