no images were found
कृषी विभागामार्फत उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांनी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
कोल्हापूर: कृषी विभागामार्फत सन २०२२ या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांच्या विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जुन २०२३ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी राज्यातील शेतकरी, व्यक्ती, गट, संस्था यांना केले आहे.
कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि सलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांच्या तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या अधिकारी / कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करण्याकरिता अधिक माहितीसाठी नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.