no images were found
स्कोडा ऑटो इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षिततेसंदर्भात गती कायम ठेवण्याची केली घोषणा
मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसंदर्भात गती कायम ठेवण्याची घोषणा केली. जागतिक स्तरावर स्कोडा ऑटोचा क्रॅश टेस्ट्स व सुरक्षिततेसह ५० वर्षांचा वारसा आहे. स्कोडा १०० एल पूर्वीच्या झेकोस्लोव्हाकियामधील प्राग-रुझिने येथे प्रथम दस्तऐवजीकरण केलेली क्रॅश
चाचणी आहे. सध्या, कंपनीचे उहेल्न्सि येथे जागतिक दर्जाचे, अत्याधुनिक पॉलिगॉन चाचणी केंद्र आहे, ज्याला ऑटोमोटिव्ह टेस्टिंग टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल ट्रेड जर्नलकडून वर्ष २०२०ची क्रॅश लॅबोरेटरी म्हणून पुरस्कारित करण्यात आले आहे. आणि २००८ पासून प्रत्येक जागतिक स्कोडा युरो
एनसीएपीकडून ५ स्टार रेटेड आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भारतातील फोक्सवॅगन ग्रुपचे पॅसेंजर वेईकल ब्रॅण्ड्स – स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन, ऑडी, पोर्श व लम्बोर्गिनी यांचे प्रतिनिधीत्व करते. ग्रुप भारतातील ग्राहकांना डिझाइन्स, बॉडी स्टाइल्स व पॉवरट्रेन्सची सर्वात इच्छित व व्यापक श्रेणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता देतो.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या विक्री, विपणन व डिजिटलचे कार्यकारी संचालक ख्रिस्तीयन कॅन वॉन सीलेन म्हणाले, ‘‘आम्ही सादर करणाऱ्या प्रत्येक नवीन वेईकलसह सुरक्षिततेचा दर्जा वाढवण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या सर्व उत्पादनांना एकत्र आणणारा समान दुवा म्हणजे गतीशील ड्राइव्हसंदर्भात अपवादात्मक पॅकेजिंग, महत्त्वाची वैशिष्ट्ये, आरामदायी राइड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपवादात्मक सुरक्षितता. स्कोडा ऑटोच्या भारतातील २ दशकांच्या वारसामध्ये एमक्यूबी- एओ-इन हे देशामध्ये विशिष्टरित्या विकसित करण्यात आलेले पहिलेच व्यासपीठ आहे.