
no images were found
शाहू मिलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिलमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 13 मे पर्यंत दररोज सकाळच्या सत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत असून यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
बुधवार दि. 10 मे रोजी सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत युवापिढीतील प्रख्यात कलाकार सत्यजित निगवेकर हे माती-शिल्प कलेची कार्यशाळा घेणार आहेत. यात माती -शिल्प कौशल्यांबाबत कृती शिबीर होणार आहे.
गुरुवार 11 मे रोजी 10.30 ते 12.30 यावेळेत गौरव काइंगडे यांचे मातीकाम (पॉटरी) कामाबद्दल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
शुक्रवार 12 मे रोजी चेतन चौगुले यांची चित्ररेखांकन आणि रंगकाम कार्यशाळा होणार आहे.
शनिवार 13 मे रोजी भाऊसो पाटील यांचे ‘ॲनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान’ याबद्दल प्राथमिक माहिती कार्यशाळा घेण्यात येणार आहे.