
no images were found
सुट्टीवर आलेल्या जवानाचा कार झाडाला धडकून जागीच मृत्यू
आजरा : कोल्हापुरात रस्ते अपघतात जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा राज्य मार्गावर ही घटना घडली आहे. तावरेवाडीजवळ हा अपघात झाला आहे.
मनसु धोंडीराम माणगुतकर(वय 32, रा. तावरेवाडी ता.गडहिंग्लज) असं जवानाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनगुतकर हे आपल्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी गावी आले होते. कामानिमित्त ते आजर्याकडे आपल्या कारने (एम.एच. 06 एएस 8556) येत असता त्यांचा कारवरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. अत्यंत कष्ट करून त्यांनी सैन्यात प्रवेश मिळविला होता. त्यांच्या अपघाती निधनाने तावरेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.