Home सामाजिक ध्यक्षपदी वैद्य दिलखुश तांबोळी तर सचिव पदी वैद्य विनायक शिंदे

ध्यक्षपदी वैद्य दिलखुश तांबोळी तर सचिव पदी वैद्य विनायक शिंदे

0 second read
0
0
102

no images were found

अध्यक्षपदी वैद्य दिलखुश तांबोळी तर सचिव पदी वैद्य विनायक शिंदे

कोल्हापूर/प्रतिनिधी : अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी वैद्य दिलखुष तांबोळी व सचिव पदी वैद्य विनायक शिंदे यांची निवड झाली आहे.महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या शिर्डी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात या निवडी घोषित करण्यात आल्या.
महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन ही संस्था आयुर्वेदाला वाहिलेली व आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी सतत कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या भारतभर अनेक शाखा असून संपूर्ण भारतभर आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कार्य करणारी व सर्वात जुनी असलेली ही संस्था म्हणजे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संस्था आहे. याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून संस्थेच्या आधारस्तंभ राज्य वैद्य व पद्मश्री वैद्य श्री देवेंद्रजी त्रिगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य राकेशजी शर्मा हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. व वैद्य एस. एन. पांडे उज्जैन हे प्रधानमंत्री आहेत. या संस्थेच्या अंतर्गत संपूर्ण भारतभर प्रादेशिक शाखा कार्यरत असून त्याचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शाखा पसरलेल्या आहेत.
सद्यस्थितीतील महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली असताना या संस्थेच्या खऱ्या कार्याची ओळख महाराष्ट्र शाखीय वैद्य वर्गाला अजूनही होऊ शकलेली नाही. याचाच प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वत्र विविध ठिकाणी अध्यक्ष यांची निवड केली गेली आहे. कोल्हापूरमध्ये ही अध्यक्षपदी वैद्य दिलखुश तांबोळी तर सचिव पदी वैद्य विनायक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
आज आयुर्वेदाला जे यश किंवा सुवर्ण दिन दिसत आहेत त्यामध्ये अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या रूपाने या वैद्य वर्गाने केलेल्या कामाचा मोठा सहभाग आहे. भविष्यात सर्वांच्या सहकार्याने आयुर्वेद प्रचार व प्रसाराचे कार्य महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन करणार आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करणार आहोत असे अध्यक्ष वैद्य दिलखुश तांबोळी तर सचिव वैद्य विनायक शिंदे यांनी सांगितले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास…