
no images were found
सिद्धगिरी हॉस्पिटलला मानाचा सुशीला नायर स्वस्थ भारत उत्कृष्टता पुरस्कार प्रदान…
स्वस्थ भारत न्यासच्या वतीने संपूर्ण देशभरतील विविध आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या व भरीव योगदान देणाऱ्या रुग्णालयांच्यापैकी नामांकित रुग्णालयांना देण्यात येणारा मानाचा ‘सुशीला नायर स्वस्थ भारत उत्कृष्टता पुरस्कार’ सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला स्वस्थ संसदच्या राष्ट्रीय अधिवेशनात भोपाल येथे प्रदान करणात आला. यावेळी हा पुरस्कार हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी भोपाल येथे स्वीकारला.
पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वानुसार सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीने गेली १३ वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील रुग्णांना अविरत सेवा देत आहे. या रुग्णसेवेची दखल घेत सिद्धगिरी हॉस्पिटलची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे स्वस्थ भारत संसदच्या समितीने सांगितले.
ट्रस्टच्या वतीने भोपाल येथील माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यालय येथे २८ ते ३० एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय स्वस्थ संसद अधिवेशनात स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी काळात आरोग्य व पत्रकारितेची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिषदेचे उद्घाटन मध्यप्रदेशचे राज्यपाल श्री.मंगूभाई पटेल, पद्मश्री रामबहाद्दूर राय, डॉ.विश्वास कैलाश सारंग (आरोग्य शिक्षण मंत्री, मध्यप्रदेश), पद्मश्री मालिनी अवस्थी याच्यासह भारतभरतील वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत दिग्गज उपस्थित होते.
स्वस्थ भारत ही ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत संस्था असून देशात आरोग्याशी संबंधित विषयांवर जागरूकता आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात ट्रस्ट कार्यरत असतो. गेल्या 8 वर्षांत ट्रस्टने अनेक स्थानिक उपक्रमांव्यतिरिक्त आतापर्यंत 10 हून अधिक देशव्यापी मोहिमा राबवल्या आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी संस्थेने दोन वेळा स्वस्थ भारतचा प्रवास केला आहे. ज्या अंतर्गत देशभरात 400 हून अधिक जनजागृती मोहीम राबवण्यात आली.