Home सामाजिक महिलांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करुन बँकेत आपली पत निर्माण करावी – विशालकुमार सिंग

महिलांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करुन बँकेत आपली पत निर्माण करावी – विशालकुमार सिंग

12 second read
0
0
36

no images were found

महिलांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करुन बँकेत आपली पत निर्माण करावी – विशालकुमार सिंग

 

कोल्हापूर : महिलांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा उपयोग करुन छोटे मोठे व्यवसाय सुरु केले पाहिजेत. व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक कर्ज घेवून व ते नियमित परतफेड करुन बँकेत आपली पत निर्माण केली पाहिजे, असे मत बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे उप आनाचालिक प्रबंधक विशालकुमार सिंग यांनी व्यक्त केले.

बँक ऑफ इंडियाव्दारा प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) कोल्हापूर मार्फत ३० दिवसांच्या महिला शिंपी (टेलर) प्रशिक्षणाची सांगता झाली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर उप आनाचालिक प्रबंधक विशालकुमार सिंग हे बोलत होते. प्रशिक्षणासाठी बचत गटातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. करवीर, पन्हाळा, हातकणंगले, कागल तालुक्यातील ३५ महिलांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. प्रशिक्षणात कपडे शिवण्याच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, बँकेच्या विविध कर्ज योजना या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 याप्रसंगी ३५ प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच या महिलांपैकी १५ महिलांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना (CMEGP) या अंतर्गत व्यवसाय कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्रकडे प्रस्ताव दिले आहेत व RSETI कोल्हापूर कर्ज मिळवण्यासाठी पाठपुरावा करत आहे.

कार्यक्रमासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) कोल्हापूरचे संचालक कुलभूषण उपाध्ये,  बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विपणन विभागाच्या अरुणा गादगे, तांत्रिक प्रशिक्षिका संचिता कुलकर्णी व आरसेटीचे सुधीर हार्डीकर, सुप्रिया पाटील, अनिल कांबळे, सुनील गुरव उपस्थ‍ित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…