
no images were found
“अजित पवार राष्ट्रवादीतच पण…”, संजय राऊतांचं सूचक विधान
बेळगाव : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी त्यांची मनधरणी करत आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होईल? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार काय भूमिका घेणार याबाबतचीही चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर भाष्य केलं आहे. “अजित पवार वारंवार सांगतायत की मी कुठेही जाणार नाही. अजित पवारांविषयीच्या या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही”, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत हे कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा आहेत, असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, अजित पवारांची चर्चा बाहेर आहे. त्यावर मी सामनातून भाष्य केलं आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहीन,असं अजित पवार वारंवार सांगत आहेत. त्यांच्याविषयीच्या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल हे सांगताय येत नाही, असं संजय राऊत म्हणाले. जबाबदाऱ्या पेलणं, ती ताकद असणं…
अजित पवार महाष्ट्रात स्थिर आहेत. ते नेते आहेत. सुप्रिया सुळे यांना मी राष्ट्रीय स्तरावर काम करताना पाहतो. त्या उत्तम काम करत आहेत. संसदेतील त्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे. पण संसदेती परफॉर्मन्स आणि राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्या पेलणं ती ताकद असणं यात खूप फरक असतो. शरद पवारांना 60 ते 65 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर गेले, असं राऊत यांनी सांगितलं.
“आम्ही सध्या सामनात फार जपून भाष्य केलं आहे. पण हे खरं आहे. राष्ट्रवादीतल्या घडामोडींमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवारांसारखा नेता काही राजकीय निर्णय घेतो, तेव्हा नक्कीत राज्याच्या राजकारणात खळबळ माजते”, असंही ते म्हणाले
\