no images were found
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार डॉ.श्री.श्रीकांत शिंदे उद्या गुरुवार दि.२७ एप्रिल २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. गेल्या गेल्या महिन्याभरातील खासदार डॉ.श्री.श्रीकांत शिंदे यांचा सलग दुसरा कोल्हापूर दौरा असून, या दौऱ्यादरम्यान लोकोपयोगी उपक्रमांचे आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता “शासकीय योजनांची जत्रा” या मेळाव्याचे अभिषेक लॉन, ब्रम्हपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दुपारी १.०० वाजता मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी रंकाळा तलावास मंजूर रु.१५ कोटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी ते करणार आहेत. यासह रंकाळा तलाव येथे Fountain With Light System बसविण्यासंदर्भात रंकाळा तलाव येथे जागेची पाहणी करणार आहेत. गत महिन्यातील दौऱ्यात राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपस्थिती दरम्यान खासदार डॉ.श्री.श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर शहरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करण्याची ग्वाही दिली होती, याअनुषंगाने दुपारी १.३० वाजता जिल्हाक्रीडा अधिकारी श्री.चंद्रशेखर साखरे यांचे समवेत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचीही माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.