
no images were found
भारतीय व्यक्तींमध्ये कोरोनरी आर्टरी डीसीज (सीएडी)चा उच्च आनुवांशिक धोका
जागतिक डीएनए दिनी, म्हणजेच २५ एप्रिल २०२३ रोजी इंडस हेल्थ प्लसच्या आनुवांशिक चाचणीवर आधारित संशोधनामधून निदर्शनास आले की, इंडसने आनुवांशिक चाचणी केलेल्या एकूण व्यक्तींपैकी २४ टक्के व्यक्तींना कोरोनरी आर्टरी डीसीज (सीएडी)चा उच्च धोका आहे आणि २९.५ टक्के व्यक्तींना त्यांच्या आनुवांशिक रचनेनुसार उच्च एलडीएल पातळ्यांसाठी उच्च धोका आहे. यामधून व्यक्तीवर सीएडीच्या संभाव्य प्रभावामधील आनुवांशिक घटकांचे महत्त्व दिसून येते अणि वैयक्तिकृत जोखीम मूल्यांकन व प्रतिबंधात्मक धोरणांसाठी गरज दिसून येते. संशोधनासाठी नमुना आकारामध्ये जवळपास १०,००० व्यक्तींचा समावेश होता, ज्यांची आनुवांशिक चाचणी करण्यात आली.
इंडस हेल्थ प्लस संशोधनामधून निदर्शनास आले की, ९० टक्के व्यक्तींना व्हिटॅमिन डी कमतरतेचा उच्च आनुवांशिक धोका आहे आणि ५७.५५ टक्के व्यक्तींना त्यांच्या आनुवांशिक रचनेनुसार व्हिटॅमिन बी१२ कमतरतेसाठी उच्च आनुवांशिक धोका आहे, ज्यामधून एकूण कार्डियोव्हॅस्कुलर आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.
इंडस हेल्थ प्लसचे प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट श्री. अमोल नाईकवडी म्हणाले, ‘‘इतर आरोग्य तपासण्यांसह विविध जीवनशैलीच्या परिस्थितीची पूर्वस्थिती समजून घेण्यासाठी आनुवांशिक चाचणी व्यक्तींमध्ये लोकप्रिय होत आहे. ही चाचणी चांगले आरोग्य मूल्यमापन करण्यामध्ये मदत करण्यासोबत विशेषत: सीएडी किंवा इतर जोखीम घटकांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींसाठी आजारांचे व्यवस्थापन देखील सुधारते.
भारतीय आनुवांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहेत आणि त्यांना अद्वितीय आरोग्यसेवा आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे आनुवांशिक चाचणीचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो. भारतात आनुवांशिक आजारांच्या वाढत्या प्रमाणासह मधुमेह व कार्डियोव्हॅस्कुलर आजार यांसारख्या जीवनशैली संबंधित आजारांचे उच्च प्रमाण आहे. ही चाचणी असे आजार होण्याचा आनुवांशिक धोका ओळखण्यास मदत करू शकते, ज्यामुळे लवकर हस्तक्षेप व व्यवस्थापन धोरणे आखता येतील.