no images were found
सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात ऑपरेशन थेटरमध्ये महिलेची छेडछाड
कोलकाता : कोलकातामध्ये एक प्रसिद्ध सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात ऑपरेशनदरम्यान एका महिलेसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.या महिलेने रुग्णालयातील मेडिकल कर्मचाऱ्यावर हा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महिला रुग्णाने दावा केला आहे की कोलकातामधील एका सुप्रसिद्ध रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं.
तिचं पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन होणार होतं. ५ जानेवारी रोजी तिला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं. तिथेच तिच्यासोबत छेडछाड करण्यात आली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मला साधारण ८ वाजता ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर ९ वाजता मला भुलीचं इंजेक्शन दिलं. ऑपरेशननंतर मला ११ ते १२ वाजेच्या दरम्यान शुद्ध आली. मात्र, भुलीचं इंजेक्शन दिल्यामुळं मला फार काही बोलता व हालचाल करता येत नव्हती. याच दरम्यान मला कोणीतरी माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत असल्याची जाणीव झाली, असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
ऑपरेशन थेटरमध्ये माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला व्यक्ती मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. मला हे सहन होत नव्हतं. त्यानंतर हळहळू मी शुद्धीवर येत होते. त्याचवेळी मला जाणवलं की कोणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे. मला सगळं काही समजत होतं मात्र मी त्याला थांबवू शकत नव्हते कारण मी अजून पूर्णपणे शुद्धीत नव्हते. जेव्हा मी पूर्णपणे शुद्धीत आले तेव्हा मला जाणवलं की माझ्या प्रायव्हेट पार्टवर कसल्यातरी खूणा आहेत, असंही महिलेने सांगितले.
पीडित महिलेचा दावा आहे की, तिच्यासोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिथे एकही महिला कर्मचारी उपस्थित नव्हती. महिलेने म्हटलं, की ऑपरेशन थेटरमध्ये माझ्यासोबत काय झालं हे मला माहिती नाही मात्र माझ्या छातीवर उजव्या बाजूला कोणीतरी स्पर्श केल्याचे निशाण आहेत आणि ते स्पष्ट दिसत आहेत. महिलेच्या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी विनयभंगअंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर महिलेचे मेडिकल टेस्टदेखील केली जाणार आहे. अज्ञात आरोपीवर आयपीएस ३५४अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.