Home धार्मिक बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार

बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार

0 second read
0
0
51

no images were found

बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार

गैररकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरुन वादग्रस्त बनलेले बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्यात आले आहे.  शिवराज नायकवडी यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंदिर कामकाज पाहण्यास आजपासून सुरुवात केली. नायकवडींनी एम. के. नाईक व सत्यनारायण शेनॉय या धर्मादाय निरीक्षकांसमवेत कामकाजाला सुरुवात केली.

आमदापूर येथील बाळूमामा मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी बाळूमामा देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे. देवस्थान ट्रस्टच्या दोन गटात अधिकृत कोण यावरून वाद सुरु होता. ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली आहे. या संदर्भात त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता. त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले व त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला होता.

आमदापूर येथील बाळूमामा मंदिरचे व्यवस्थापन पाहण्यासाठी बाळूमामा देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे. देवस्थान ट्रस्टच्या दोन गटात अधिकृत कोण यावरून वाद सुरु होता. ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली आहे. या संदर्भात ते वकिलांना भेटायला आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, साथीदारांनी त्यांच्यावर येथे भर रस्त्यात हल्ला केला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…