
no images were found
‘राजाराम‘मध्ये महाडिकांचा विजय, सतेज पाटलांना मोठा धक्का
कोल्हापूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. दरम्यान या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस गटनेते आणि आमदार सतेज पाटील हे आमने सामने आले होते. मागच्या 28 वर्षांपासून महाडिक यांच्याकडे असलेल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी सतेज पाटील यांनी यंदा कंडका पाडायचा अशा टॅगलाईवर चंग बांधला होता.
मागच्या एक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धुमशान सुरू आहे. कोल्हापूर येथील रमण मळा येथे या कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तब्बल 700 मतांची आघाडी सत्ताधारी महाडिक गटाने घेतली आहे. या निवडणुकीत 5 फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याचबरोबर संस्था कडातून महादेवराव महाडिक यांनी 84 मते मिळवत आपला विजय निश्चित केला आहे. सतेज पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे ज्या भागातील मतमोजणी झाली आहे. तो महाडिक यांचा बालेकिल्ला समजला जातो.