no images were found
पंतप्रधान मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया..
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. आता शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून निषेध व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर जगभरात आहे या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याची व्यवस्था केली आहे. जी 20 चं यजमानत्व मिळवलं आहे. मोदींचा एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा, निषेध करणं तेवढा थोडा आहे. प्रत्येक देशवासियांना अभिमान वाटावा, असं त्यांचं काम आहे. संपूर्ण देशातील दीडशे कोटी जनता त्यांचा परिवार आहे. जनतेला ते आपलं मानतात. त्यांच्या मातोश्रींचं दुःख झालं तरीही त्यांनी देशातील प्रकल्पाला प्राधान्य दिलं.अस असताना उद्धव ठाकरे यांनी द्वेषापायी हे वक्तव्य केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. समोरील व्यक्तीच्या यशामुळे पोटदुखी निर्माण होते. त्यामुळे असं वक्तव्य करण्याचं पाप करतात…
तर नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ते म्हणाले, ‘ ज्यांनी 25 वर्षे युती म्हणून काम केलं. त्यांच्याबाबत हे असं बोलत आहेत. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सत्तेसाठी पायदळी तुडवले. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? हे त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. बाळासाहेबांनी दुश्मनाबद्दलही कुणाबाबत असं वक्तव्य केलेलं नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी सुनावलं.