Home राजकीय  शिंदे गटाबरोबर कुठल्याही प्रकारची राजकारणाची युती अशक्य-संजय पवार

 शिंदे गटाबरोबर कुठल्याही प्रकारची राजकारणाची युती अशक्य-संजय पवार

2 second read
0
0
34

no images were found

 शिंदे गटाबरोबर कुठल्याही प्रकारची राजकारणाची युती अशक्य-संजय पवार

 

कोल्हापूर (प्रतिनिधी ): राजकारणामध्ये युती आघाडी या नेहमीच होत असतात. मात्र सत्तेसाठी दलबदलूपणा हा दुर्देवी आहेच तो ही राजकारणाचा भाग आहे..पण उद्धवजींसारख्या संयमी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीशी खंजीर खुपसून सत्ता व लोभी भाजपशी युती करणाऱ्या शिंदे गटाबरोबर कुठल्याही निवडणुकीमध्ये समझोता हा कदापि मान्य होणार नाही. काल बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये तयार केलेले आणि शिंदे गटाच्या मदतीने झालेले पॅनेल हे आम्हाला मान्य नसून शिंदे गटाशी कुठलीही आणि कदाही सोयरीक आयुष्यामध्ये भविष्यात कुठल्याही राजकारणात शक्य होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन संजय पवार यांनी करून बाजार समितीच्या मध्ये मांडलेल्या या महाविकास आघाडीच्या विरोधातल्या पॅनलला शिंदे गटाच्या उपस्थितीला प्रचंड विरोध दर्शवलाय. या निवडणुकीला विरोध दर्शवला. हिंदुत्वाचा वसा आणि वारसा घेत प्रत्येक ठिकाणी उद्धवजींची व आदित्यजींची अवहेलना करणाऱ्या शिंदे गटाला आणि उध्दवजीची ऐकेरी वर्तणूक करून उद्धवजींना अत्यंत अपमानास्पद रित्यारून पायउतार करून आजही सत्तेची स्थान उरमटपणाने भोगत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला वाईट दिवस दाखवणाऱ्या या शिंदे गटांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या बरोबर कुठल्या प्रकारची युती व आघाडी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मला मान्य नाही.

राजकारणामध्ये मतमतांतर असू शकतात परंतु सत्तेच्या कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारच यश दृष्टीक्षेपात असलं तरीसुद्धा शिंदेंच्या गटाबरोबर कधीही कुठल्याही प्रकारची युती कोल्हापूरात केली जाणार नाही .असं माझं व्यक्तिगत मत आहे उद्याच्या होणाऱ्या बाजार समितीमध्ये भले अपयश पदरी आलं तरी अडचण नाही परंतु शिंदे गटाशी कुठलीही युती कधीही होणार नाही .असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.. महाविकास आघाडीच्या कोणतीही आघाडी करताना आता होणाऱ्या शिवसेनेची नैसर्गिक आणि राज्यातली युती लक्षात घेता शिवसेनेची सन्मानाने वागणूक सातत्याने ठेवावी कोल्हापुरातल्या सर्वच मतदारसंघांमध्ये निकाल पालटवण्याची ही शिवसेनेकडे क्षमता आहेत हेही महाविकास आघाडीने लक्षात ठेवावे. महाविकास आघाडीने दुर्लक्ष दिल्यामुळे संतापलेल्या अवस्थेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला होता तथापि मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्याशी कुठल्याही परिस्थितीत स्थान मिळणार नाही आणि ज्या ठिकाणी शिंदे गट असेल अशी कुठलीही युती आम्हाला कदापिही मान्य होणार नाही उद्याच्या राजकारणामध्ये उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता प्राप्त केलेल्या शिंदे गटाला प्रत्येक ठिकाणी पद्धत चितपट करून त्यांना महाराष्ट्राच्या *राजकारणातून नामोहरण करणे हीच आमचं उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन श्री संजय पवार यांनी पत्रकार द्वारे केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…