
no images were found
पुरेसा व्यायाम करून वाढणार््या कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतो- नमिक पॉल
गेल्या तीन दशकांमध्ये टीव्हीवरील मालिकांच्या आशयाचा ट्रेण्ड निश्चित करण्यात ‘झी टीव्ही’ ही वाहिनी अग्रगण्य राहिली आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडणार््या अनेक कथा या मालिकांद्वारे सादर केल्यानंतर अभूतपूर्व आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे एकत्र आलेल्या एका आगळ्या दाम्पत्याची कथा ‘झी टीव्ही’ वाहिनी प्रेक्षकांपुढे घेऊन आली आहे. ‘लग जा गले’ नावाच्या या आगामी मालिकेचे कथानक दिल्लीत घडते. स्वत:च्या अंगच्या हुशारीने यशस्वी हॉटेलचा मालक बनलेला शिव (नमिक पॉल) हा उद्योगपती आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी दिवसा मिळेल ती नोकरी करणारी कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती इशानी (तनिषा मेहता) यांची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. या दोघांमध्ये अनेकदा अनेक प्रकारचे गैरसमज होऊनही आणि एकमेकांबद्दल अविश्वास असतानाही आपल्या भावंडांसाठी या दोघांना एकमेकांशी लग्न करावे लागते, तेव्हा काय घडते, याचा वेध या मालिकेत घेण्यात आला आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नमिक आणि तनिषा मेहता यांच्यातील नात्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असले, तरी लग जा गलेमधील नमिकच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही चर्चा सुरू आहे. मालिकेत रुबाबदार सूट-बूट परिधान करून नमिकने आपले उच्चभ्रू व्यक्तिमत्त्व जरी सादर केले असले, तरी काही प्रसंगांमध्ये त्याने आपल्या पीळदार शरीराचेही दर्शन घडवले आहे. शिवच्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात प्रवेश करून ही भूमिका साकारण्यासाठी नमिकने रोज ठरावीक पध्दतीच्या जीवनशैलीचा अंगीकार केला आहे. त्यासाठी दररोज तो न चुकता भरपूर व्यायाम करतो. असे असले, तरी आपल्याला आवडणारे पदार्थ खाण्यासही तो कमी करीत नाही. मात्र असे वजन वाढविणारे पदार्थ खाल्ल्यावर तो जास्तीचा व्यायाम करून वाढीव कॅलरी जाळून टाकतो आणि आपले शरीर बांधेसूद कसे राहील, याची दक्षता घेतो.