no images were found
भगवान महावीर अध्यासनास सौ मधुबाला दिलीप शेटे यांची बृहत देणगी
कोल्हापूर मधील प्रतिभानगर येथील श्री दिलीप शेटे व त्यांच्या पत्नी सौ मधुबाला शेटे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी 11,111/- रु. अशी बृहत देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांचेकडे सुपूर्द केली. श्री व सौ शेटे हे दोघे शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर असून श्री दिलीप शेटे हे MSFC मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते वृत्तपत्रात आलेली देणगीची बातमी पाहून त्यांनी हे बृहत दान भगवान महावीर अध्यासन शिवाजी विद्यापीठ येथे येवून दिले. सदर बृहत देणगी बद्दल मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी श्री अजित चौगुले यांनी श्री दिलीप शेटे यांचे अभिनंदन केले.
भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस (100 %) पात्र आहे. सदर देणगी ऑ नलाईन व स्कॅन कोड ने देणेची सुविधा उपलब्ध आहे.