
no images were found
अक्षय्य तृतीयेनिमित्त शनिवारी सराफ बाजार सुरू
कोल्हापूर – अक्षय्य तृतीयेनिमित्त येत्या शनिवारी (ता. 22) सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी दिली. ते म्हणाले, साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया व रमजान ईद एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे नेहमी शनिवारी बंद असणारा बाजार सुरू राहील, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व अक्षय्य अशा सोने खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहनही त्यांनी केले.