no images were found
राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव
कोल्हापूर : शासनाच्या विविध योजनेअंतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेचा राज्य शासनाच्यावतीने गौरव करण्यात आला. हा गौरव मुंबई येथे एन.सी.पीए. भवन नरिमन पाँईट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या हस्ते प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. नगर विकास दिनाचे औचित्य साधून सन 2022-23 मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील महानगरपालिकांमध्ये विविध योजनांची अंमलबजावणी, विविध उपक्रम व उत्कृष्ट वसूली केल्याबद्दल सर्व महानगरपालिकेंना गुण देण्यात आले. यामध्ये ड वर्ग महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. ड वर्ग महानगरपालिका या गटातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर वसूली, पीएम स्वनिधी व इतर उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेबद्दल हा गौरव करण्यात आला आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना.दिपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभाग (1) अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगर विकास विभाग नवि-2 च्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी, नगर परिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक डॉ.किरण कुलकर्णी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल व सर्व महानगरपालिकेचे आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.