Home आरोग्य तज्ञांकडून समजून घ्या व्हेरिकोस व्हेन्सची समस्या आणि त्यावरील अत्याधुनिक  उपचार

तज्ञांकडून समजून घ्या व्हेरिकोस व्हेन्सची समस्या आणि त्यावरील अत्याधुनिक  उपचार

36 second read
0
0
31

no images were found

तज्ञांकडून समजून घ्या व्हेरिकोस व्हेन्सची समस्या आणि त्यावरील अत्याधुनिक  उपचार

दरवर्षी व्हेरिकोस व्हेन्स ने कोट्यावधी लोक त्रस्त होत आहेत.  यामध्ये शिरा मोठ्या आणि वेड्यावाकड्या होतात.  याचा त्रास अधिकतर केसेस मध्ये पायामध्ये जास्त होतो कारण सतत उभे राहिल्याने आणि चालण्याच्या दबावा मुळे शरीराच्या खालच्या भागातील शिरांवर ताण पडत असतो. लोक या समस्येला गंभीरतेने घेत नाहीत, पण ही समस्या म्हणजे फक्त पायाची नसून हृदयाकडे रक्त घेऊन जाणार्‍या शिरांची समस्या असते. अशा परिस्थिती मध्ये रक्त हृदयापर्यंत नीटपणे पोहोचू शकत नाही.

मणिपाल हॉस्पिटल्‍स, बाणेर-पुणे येथील न्‍यूरोइन्‍टरवेन्‍शनल रेडिओलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. संतोष पाटील म्‍हणाले “खराब किंवा कमकूवत व्हॉल्व्ह्ज मुळे व्हेरिकोस व्हेन्स होतात.  धमन्या या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडे शुध्द रक्ताचा पुरवठा करत असतात. तर शिरांच्या माध्यमातून  अशुध्द रक्त हे शरीराच्या विविध अवयवांकडून हृदयाकडे पाठवले जात असते.  हृदयाकडे रक्त पाठवत असतांना या शिरांना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करावे लागते.” डॉ.संतोष पुढे सांगतात, पायाच्या स्नायूंची आकुंचन पावण्याची क्रिया ही पंपासारखी काम करत असते आणि  शिरांच्या लवचिकते मुळे रक्त हे हृदयाकडे पाठवले जाते.  या शिरांमध्ये असलेले हे  छोटे व्हॉल्व्ह्ज रक्त हृदयाकडे घेऊन जातांना उघडतात आणि बंद झाल्यामुळे रक्त पुन्हा पाठी येत नाही.  जेंव्हा हे व्हॉल्व्ह्ज कमकूवत होतात किंवा खराब होतात त्यावेळी रक्त हे पुन्हा मागे येऊ लागते आणि शिरांमध्ये साठून राहते, ज्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि वेड्यावाकड्या होतात.

व्हेरिकोस व्हेन्समुळे विशेषकरुन घोट्यापाशी हे जखमा होतात.  कधीकधी शिरांमध्ये ताण येऊन त्या वाढतात, त्यामुळे पाय दुखू लागतात आणि पायाला सूजही येते.  काही केसेस मध्ये त्वचेजवळील शिरा फूटतात आणि त्यामुळे रक्तस्त्रावही होऊ लागतो.या भागातील त्वचा काळी पडते आणि कधीकधी खाज सूटू लागते अशा परिस्थितीला व्हेरिकोस एक्झिमा असेही म्हणतात. सामान्यत: व्हेरिकोस व्हेन्स वर सर्जिकल पध्दतीने किंवा लेझर/ रेडिओफ्रीक्वेन्सी ॲब्लेशन सारख्या थर्मल ॲब्लेशन सारखे उपाय केले जातात. व्हेरिकोस व्हेन्स मधील सर्वात अत्याधुनिक उपचाराला व्हेनासील (ग्लू एम्ब्लॉयझेशन)  असे म्हटले जाते, यामध्ये एक मेडिकल ग्रेड गोंद वापरला जातो ज्याचा उपयोग करुन पायातील सॅफेनस शिरा या पूर्णत: बंद केल्या जातात. कालांतराने या बंद झालेल्या शिरा आकुंचन पावतात आणि नाहीशा होतात ही उपचारपध्दती फक्त एका सूईच्या  आतून (पिनहोल) लोकल ॲनेस्थेशियाच्या माध्यमातून होते. 

रुग्णाला या प्रक्रियेत खूपच कमी त्रास होतो.  या अत्याधुनिक उपचारामध्ये कोणत्याही सलाईन इंजेक्शनची किंवा ॲनेस्थेशियाची गरज नसते. व्हेरिकोस व्हेन्सच्या  आजपर्यंतच्या सर्व प्रक्रियांमध्ये स्टॉकिंग्ज ची गरज पडत असे. ओपन सर्जरी असो किंवा, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, लेझर ॲब्लेशन आणि अगदी मेकॅनोकेमिकल अब्लेशन तंत्र असो.  व्हेनासील तंत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्टॉकिंग्जची गरज नसते.  त्याच बरोबर रुग्ण हा लवकर बरा होतो आणि तो उपचार घेतल्यानंतर लगेचच आपले रोजचे काम सुरु करु शकतो.  हे उपचार वयोवृध्द रुग्णांसाठी किंवा  अनेक आजार असणार्‍या लोकांसाठीही  अतिशय सुरक्षित आहेत. याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…