no images were found
विद्यार्थ्यांमधील नैराश्य घालवण्यासाठी संस्कार वर्ग आवश्यक : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात संस्कार वर्गाची सुरुवात
कोल्हापूर : सुगम संस्था, ब्राम्हण सभा करवीर आणि भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वयोगट ९ ते १५ वर्षाखालील अनेक मुल-मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. १७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत सकाळी १० ते १२ यावेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे.
सुगम संस्थेच्यावतीने स्त्रोत्र, योगा, ध्यान, क्रिया कलाप, व्यक्तीमत्व विकास, चित्रकला, एका परकीय भाषेची ओळख, पर्वतारोहणाची ओळख, चरित्रकथन, लोकगीते, समाज सेवा, प्रकल्प भेट, देवाची आरती अशा सर्व गोष्टी आनंदाने शिवकल्या जात आहेत. त्याचबरोबर दुग्ध प्रकल्प, ऑक्सिजन प्रकल्प, गोबरगेस निर्मिती, ऐतिहासिक किल्ला अशा प्रकल्पांना भेटी दिल्या जाणार आहेत. लहान मुलांमध्ये समज निर्माण व्हावी, आकलन क्षमता वाढावी यासाठी या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी आज या शिबिरातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन संवाद साधला. शिबिराच्या माध्यमातून शिकलेल्या सर्व गोष्टींचे पालन घरी गेल्यानंतर केले पाहिजे असे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती, विचार, संस्कार अशा गोष्टी पुरव्यासाठी यापुढेही विविध कार्यक्रम घेणार असल्याचे नमूद केले.
हे शिबीर यशस्वी होण्यासठी मयूर कुलकर्णी, रीमा चिकोडे, विद्या तगारे, मनीषा पाटील, शीतल पाटील, विजया सुतार, वर्षा कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, हर्षदा जोशी, शिला पुराणिक आदी परिश्रम घेत आहेत