
no images were found
टेरेन्स लुईसला मिळाला डान्स मधील चार्ली चॅप्लिन
इंडियाज बेस्ट डान्सर या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या स्वतःच्या डान्स रियालिटी फॉरमॅटच्या तिसऱ्या सत्राने त्यातील अत्यंत प्रतिभावान डान्सर्सच्या बळावर लोकांचे हृदय काबिज केले आहे. या वीकएंडला शोमधला रोमांच दुणावणार आहे कारण ‘बेस्ट बारह’ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मेगा ऑडिशनमध्ये हे स्पर्धक आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स देतील. यांच्यात एक स्पर्धक असा आहे, ज्याने ऑडिशन फेरीतच आपली क्षमता सिद्ध केली आणि थेट ‘बेस्ट बारह’मध्ये स्थान पटकावले. हा स्पर्धक आहे अनिकेत चौहान.
‘बेस्ट बारह’मध्ये सर्वप्रथम प्रवेशणाऱ्या, आपले लकी काळे आणि पांढरे मोजे घालणाऱ्या अनिकेतने हे पुन्हा सिद्ध करून दाखवले की, त्याला हा गौरव का प्राप्त झाला. हा 20 वर्षांचा तरुण पुन्हा एकदा आपल्या सुंदर परफॉर्मन्सने प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसणार आहे. यावेळी तो रॉकस्टार चित्रपटातील ‘हवा हवा’ गाण्यावर परफॉर्म करणार आहे. त्याचा परफॉर्मन्स पाहून थक्क झालेले सगळे कोरिओग्राफर्स अनिकेतचे अभिनंदन करण्यासाठी मंचावर जातील. यावेळी ‘अनिकेतला ऑडिशन फेरीतूनच ‘बेस्ट बारह’मध्ये घेऊन जाण्याचा निर्णय चूक होता की बरोबर?’ या टेरेन्स लुईसच्या प्रश्नाला ते जोरात सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतील.
अनिकेतच्या परफॉर्मन्सचे कौतुक करताना टेरेन्स लुईस म्हणाला की अनिकेत म्हणजे डान्समधला चार्ली चॅप्लिन आहे. तो पुढे म्हणाला, “तुला परफॉर्म करताना पाहून मला सिने-इतिहासातील एका महान व्यक्तिमत्वाची आठवण आली. कोणत्याही अॅक्टिंग स्कूलमध्ये हेच सांगितले जाते की, त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणताच नट नाही. तो अभिनेता म्हणजे, चार्ली चॅप्लिन. तो त्या काळातील सर्वात विनोदी अभिनेता होता. तो डान्सर नव्हता, पण आज माझ्या मनात हा विचार आला की, जर चार्ली चॅप्लिन डान्सर असता, तर त्याने तुझ्यासारखाच डान्स केला असता! तू ज्या पद्धतीने अॅक्ट करतोस, नक्कल करतोस आणि कॉमेडी करतोस त्यावरून हे जाणवते की तुला डान्स करताना खूप मजा येत असणार. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी मस्त हसू असते! चार्ली चॅप्लिनप्रमाणेच तुझ्या चेहऱ्यावरही हास्य असते. त्याच्यात दैवी अंश होता आणि भावना तो खूप सुंदररित्या व्यक्त करू शकत असे. काहीही न बोलता खूप बोलून जात असे. तुझ्यात देखील परफॉर्मन्सच्या माध्यमातून खूप काही सांगण्याची क्षमता आहे. तू डान्समधला चार्ली चॅप्लिनच आहेस. देव तुझे भले करो!”