Home सामाजिक कोल्हापूर बसस्थानकातील नादुरुस्त नळ, तसेच अन्य त्रुटी दूर करा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन 

कोल्हापूर बसस्थानकातील नादुरुस्त नळ, तसेच अन्य त्रुटी दूर करा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन 

6 second read
0
0
40

no images were found

कोल्हापूर बसस्थानकातील नादुरुस्त नळ, तसेच अन्य त्रुटी दूर करा  – सुराज्य अभियानाचे निवेदन 

कोल्हापूर–  कोल्हापूर शहरातील बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेल्या अवस्थेत आहेत, तसेच तेथील जागा अत्यंत अस्वच्छ आहे. पिण्याच्या पिण्यासाठी या ठिकाणी भांडे अथवा अन्य काही उपलब्ध नाही. सध्या उन्हाळ्याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी न मिळाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरी कोल्हापूर बसस्थानकातील नादुरुस्त नळ, तसेच अन्य त्रुटी दूर कराव्यात या मागणीचे निवेदन राज्य परिवहन महामंडाळाच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या वतीने देण्यात आले. निवेदनाची नोंद घेऊन योग्य ती कृती करू असे आश्‍वासन विभाग नियंत्रकांनी दिले. 

या प्रसंगी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, भ्र्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब खोतलांडे, सुराज्य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, दीपक कातवरे, जोतिबा बाळेकुंद्री, मधुकर नाझरे उपस्थित होते. 

सुराज्य अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या निवदेनात अन्य पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत

१. मुख्य बससस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी ‘कुलर’ उपलब्ध आहे; मात्र तो आता लांब असल्याने प्रवाशांना पटकन लक्षात येत नाही. तरी ‘कुलर’ सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा.
२. शौचालय अस्वच्छ असून आतील सर्व नळ चालू अवस्थेत नाहीत. तेथेही अस्वच्छता, तसेच दुर्गंधी आहे. तरी याकडे लक्ष द्यावे.
३. रंकाळा बसस्थानकात फलाटांवर जेथे बसेस लागतात तेथे वरती स्थानकांची नावे नाहीत. त्यामुळे नवीन प्रवाशांना गाडी कोणती लागते ते कळण्यास वाव नाही. तरी तेथील फलक तातडीने रंगवण्यात यावेत.
कितीही चांगली सुविधा देण्यात आल्या तरी खासगी वाहतूक नफ्यासाठीच चालवल्या जातात. एस्.टी. मात्र नफा-तोटा यांचा विचार न करता रात्रंदिवस सर्वसामान्यांचा अखंडपणे धावते. त्यामुळे एस्.टी. चा उत्कर्ष व्हावला हवा. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी बसस्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी चांगल्या प्रकारे दिल्यास अधिकाधिक प्रवासी एस्.टी. कडे आकर्षित होतील. याविषयी गांभीर्य लक्षात घेऊन बसस्थानकाची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी, तसेच केवळ  मोहिमेपुरती बसस्थानके कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना आखण्यात यावी, असे आवाहन सुराज्य अभियानाकडून एस्.टी. प्रशासन आणि राज्य सरकार यांना करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…