no images were found
‘हम रहें ना रहें हम’ आणि ‘सपनों की छलांग’ या दोन नवीन मालिकां सोनी एन्टरटेन्मेंटवर
जिवंत व्यक्तिरेखा आणि त्यांच्या काळाशी संबद्ध कथा प्रेक्षकांपुढे सादर करण्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन नेहमीच अग्रेसर असते. या वाहिनीवर सादर झालेल्या कथा-आधारित मालिकांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही, तर भारतीय टेलिव्हिजनला काही अप्रतिम मालिकांचा ठेवा दिला आहे. 9 ते 10 या प्राइम टाइमसाठी ही वाहिनी आता दोन नव्या कोऱ्या मालिका घेऊन आली आहे-
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे प्रमुख प्रदीप हेजमाडी म्हणतात, “आमच्याकडे सुंदर आणि काळाशी सुसंगत कहाण्या आहेत, ज्या लोकांपुढे यायलाच हव्यात. या कथा विचार करायला लावणाऱ्या असून त्यातील व्यक्तिरेखा प्रेरणादायक आहेत. मानवी भावना आणि जिद्दीचे प्रतिबिंब त्यात आहे. त्यामुळे आमच्यासोबत घालवलेला प्रेक्षकांचा प्रत्येक दिवस संस्मरणीय होतो. 9 ते 10 या प्राइम टाइममध्ये कथा-आधारित कार्यक्रमांची बाजू बळकट करत ‘हम रहें ना रहें हम’ आणि ‘सपनों की छलांग’ या दोन नवीन मालिका सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या दोन्ही मालिकांमधून एक अनोखा दृष्टिकोन आणि सशक्त व्यक्तिरेखा प्रेक्षकांपुढे येतील.”
‘हम रहें ना रहें हम’ ही दोन अत्यंत धडाडीच्या, सक्षम महिलांची गोष्ट आहे. या दोन्ही महिला समाजाच्या दोन अगदी वेगवेगळ्या टोकाच्या स्तरातून आलेल्या आहेत आणि आपापल्या स्तरात प्रभावी आहेत. ही दमयंती नामक एका अत्यंत तत्वनिष्ठ, परंपरावादी राजमातेची गोष्ट आहे. रणकगड येथील बारोट या शाही घराण्याची ती राजमाता आहे. तर, सुरीली एक चुणचुणीत, आधुनिक विचारांची मुंबईची मुलगी आहे. या मालिकेत कोणत्याही बदलाचा विरोध करणाऱ्या मानवी स्वभावाचे पैलू दाखवले आहेत. बऱ्याचदा माणसाला बदलाची भीती वाटते, त्यामुळे बदलाचा विरोध करणे किंवा परिस्थितीपासून पळ काढणे हे दोनच मार्ग त्याच्यापुढे उरतात. या जीवनाशी निगडीत आणि प्रेरणादायक कथानकात किट्टू गिडवानी दमयंती बारोटच्या तर टीना दत्ता सुरीली अहलुवालियाच्या भूमिकेत आहे. जय भानुशाली या मालिकेत शिवेंद्र बारोट ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या दोन्ही स्त्रियांचे मार्ग अत्यंत भिन्न दिसत असले, तर आपल्या घराण्याच्या परांपरांशी इमान राखण्याची त्यांची धडपड सारखीच आहे. दमयंती आपल्या परीने आपल्या घराण्याचा मान आणि रिवाज सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करते तर काळाशी जुळवून घेत घेत सुरीली आपल्या आई-वडिलांच्या आठवणी आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करते. स्वस्तिक प्रॉडक्शन्स द्वारा निर्मित ‘हम रहें ना रहें हम’ हा एका प्रसिद्ध तुर्की मालिकेचा रिमेक आहे. ही मालिका 10 एप्रिलपासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होईल.
स्वस्तिक प्रॉडक्शन्सचे सिद्धार्थ कुमार तिवारी म्हणतात, “एकामागून एक प्रत्येक मालिकेतून आम्ही आमचा आवाका वाढवण्याचा, रूढींना आव्हान देण्याचा आणि काही तरी नवीन आणि संस्मरणीय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या सहयोगाने ‘हम रहें ना रहें हम’ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हो दोन अत्यंत भिन्न, स्वतंत्र महिलांची गोष्ट आहे, पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे: आपल्या वारशाचे जतन करण्याची मनीषा. एक दमदार व्हिजन आणि सशक्त भागीदारी यांच्या बळावर मला विश्वास वाटतो की, ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल आणि त्यांना एक परिपूर्ण व्ह्यूईंग अनुभव देईल.”
सपनों की छलांग’ या मालिकेत प्रेक्षकांना राधिका यादवच्या माध्यमातून एक नवीन दृष्टिकोन अनुभवता येईल. राधिका ही हिंमत आणि दृढनिश्चय या गुणांनी परिपूर्ण मुलगी आहे. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ती झाशीहून स्वप्ननगरी मुंबईत आली आहे. या मालिकेत राधिकेची मुख्य भूमिका करत आहे, एक होतकरू अभिनेत्री मेघा रे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका नव्या अनोळखी शहरात आलेल्या मुलीची ही गोष्ट आहे. आपल्या आई-वडिलांना, म्हणजे सुमन यादव (कशिश दुग्गल) आणि राधेश्याम यादव (संजीव जोटांगिया) यांना राधिका हे सिद्ध करून देऊ पाहात आहे की, ती स्वतःच्या पायांवर उभी राहून त्या दोघांनाही आधार देण्यासाठी समर्थ आहे. पण आपला हा हेतु साध्य करण्यासाठी एका अनोळखी शहरात जाऊन, पहिल्या नोकरीचा आणि आपल्या कडक बॉसचा दबाव, तणाव सहन करून तसेच श्रीमोई बॅनर्जी (साध्वी मजुमदार), वैशाली तिवारी (अनुशुब्धा भगत) आणि प्रीती धिंग्रा (अल्मा हुसेन) या तीन अगदी वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेल्या रूममेट्सशी जुळवून घेण्याचे आव्हान तिला पेलावे लागणार आहे. ही इन्विक्टस टी मीडियावर्क्सची निर्मिती आहे. ही आधुनिक काळाची मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन (SET)वर 10 एप्रिलपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता प्रसारित होणार आहे.