Home मनोरंजन ‘नॅशनल सिबलिंग्ज डे’निमित्त ‘झी टीव्ही’वरील कलाकारांनी जागवल्या आपल्या भावंडांबरोबरच्या आठवणी!

‘नॅशनल सिबलिंग्ज डे’निमित्त ‘झी टीव्ही’वरील कलाकारांनी जागवल्या आपल्या भावंडांबरोबरच्या आठवणी!

4 second read
0
0
32

no images were found

‘नॅशनल सिबलिंग्ज डे’निमित्त ‘झी टीव्ही’वरील कलाकारांनी जागवल्या आपल्या भावंडांबरोबरच्या आठवणी!

आपल्या भावंडांबरोबर खास नाते निर्माण करण्यासाठी ‘नॅशनल सिबलिंग्ज डे’ (‘राष्ट्रीय भावंड दिन’) साजरा केला जातो. आपल्या जन्मापासून आपल्याला सोबत करणारी आपली भावंडे ही आपल्याला मिळालेले सुप्त वरदान आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. लहान असताना आपल्या भावंडांशी आपण खूप भांडतो. पण जसे आपण मोठे होतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या भावंडांच्या जागी आपण दुसर्‍्या कोणाचीही कल्पना करू शकणार नाही. कारण आपल्या भावंडांना आपला स्वभाव अंतर्बाह्य ठाऊक असतो आणि कोणत्याही परिस्थितीत ती तुमच्या मागे उभी राहतात. नॅशनल सिबलिंग्ज डे निमित्त ‘झी टीव्ही’वरील ‘मीत’मधील मीत हूडाची भूमिका रंगवणारी आशी सिंह, ‘मैत्री’मध्ये नंदिनीची भूमिका साकारणारी भाविका चौधरी, ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या खरे आणि ‘कुंडली भाग्य’मध्ये माहीची भूमिका रंगवणारी रोझ सरदाना या कलाकारांनी आपल्या भावंडांबरोबरच्या आठवणी जागवतानाच आपल्या भावंडांबद्दल आपल्याला किती कृतज्ञता वाटते, तेही सांगितले.

‘मीत’मध्ये मीत हूडाची भूमिका रंगवणारी आशी सिंह म्हणाली, “माझ्या दृष्टीने या सिबलिंग्ज डेचं महत्त्व असं आहे की माझी बहीण कशीश हिच्याशी असलेल्या माझ्या नात्याचं महत्त्व त्या दिवशी मला समजतं. एरवी वर्षभर आम्ही एकमेकींशी भांडत असतो, पण तिचं असणं हा मला मिळालेला एक आशीर्वाद आहे. बहिणीपेक्षाही ती माझी मैत्रीण, एक उत्तम मैत्रीण अधिक आहे.

‘मैत्री’मध्ये नंदिनीची भूमिका रंगवणारी भाविका चौधरी म्हणाली, “भावंड असणं हे नक्कीच एक वरदान आहे. कारण अनेकदा तुमच्या आई-वडिलांना तुमचं म्हणणं कळत नाही, पण ते तुमच्या भावंडांना लगेच समजतं. माझा भाऊ अभिनव हेच माझं जग आहे. लहानपणी इतर सर्वच भावा-बहिणींप्रमाणे आम्ही खूप भांडत असू. पण आज अगदी उलट स्थिती आहे. आज आम्ही एकमेकांवाचून जगू शकत नाही. आम्हाला भेटता येत नाही, तेव्हा संदेश पाठवून किंवा व्हिडिओ फोनद्वारे आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहतो.

‘कुंडली भाग्य’मध्ये माहीची भूमिका रंगवणारी रोझ सरदाना म्हणाली, “तुमची भावंडं ही तुम्हाला लाभलेले सर्वोत्कृष्ट मित्र-मैत्रिणी असतात. माझा धाकटा भाऊ कबीर ही माझी जीवनरेखाच बनला आहे. तसा तो स्वभावाने फारच खट्याळ आणि खोडकर आहे. मला त्रास देण्याची एकही संधी तो सोडत नाही. त्याला बर्‍्याच काळापासून हवी असलेली एक गोष्ट यंदा मी त्याला देणार आहे. त्याच्याबरोबरच्या बालपणापासूनच्या सर्व आठवणी मी मनात जपून ठेवल्या आहेत. आमच्यातील नातं हे कायम असंच राहील, अशी मी आशा करते.

‘भाग्यलक्ष्मी’मध्ये लक्ष्मीची भूमिका रंगवणारी ऐश्वर्या खरे म्हणाली, “माझ्या जीवनात दोन लहान बहिणी असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या बहिणी मिळाल्याच नसत्या. त्यांच्याबरोबर माझ्या काही अतिशय सुंदर आठवणी आहेत. मला चांगलं आठवतंय, जेव्हा आम्ही भोपाळवरून मुंबईला स्थलांतरित होत होतो, तेव्हा मी सर्वात मोठी असले, तरी त्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार नव्हते. पण आम्ही तिघींनी मिळून ती जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आणि तेव्हापासून आम्ही एकत्रच आहोत. त्या खरंच माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…