no images were found
सुईच्या टोकाएवढंही कोणी अतिक्रमण करु शकत नाही; अमित शहांचा थेट चीनला इशारा
अरुणाचल प्रदेश – भारताविरोधात कटकारस्थान करण्याची संधी चीन कधीच सोडत नाही. काही दिवसांपूर्वीच चीनने भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशच्या हद्दीतील काही ठिकाणांची नावं बदलली.त्यामुळे देशभरात संतापाची लाट उमटली. सध्या हे प्रकरण जगभरात चर्चेत आले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा सीमावर्ती राज्य अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, सुईच्या टोकाएवढंही भारत अतिक्रमण स्वीकारणार नाही.,’ असा इशारा दिला. गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता.
गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आक्षेप घेत बिजिंगमध्ये चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं माध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा केला. त्यामुळे त्या भागात भारताचा कोणताही अधिकारी किंवा नेत्याचा दौरा हा त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचंही चीनच्या प्रवक्त्यानं म्हटलं होतं. त्यांचा (गृहमंत्री अमित शहा) दौरा सीमाभागातील शांततेसाठी अनुकूल नाही. आमचा याला कडाडून विरोध आहे, असंही चिनी प्रवक्त्यानं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
चीननं गृहमंत्री अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात अमित शहांनी चीनला चांगलंच फटकारलं आहे. अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर असताना अमित शहा म्हणाले की, आमचं लष्कर आणि आयटीबीपी जवानांच्या शौर्यामुळे आमच्या देशाच्या सीमेवर आम्हाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. तो काळ गेला जेव्हा कोणीही आमची जमीन काबीज करू शकत होता, पण आता सुईच्या टोकाएवढीही जमीन काबीज करता येणार नाही, असं अमित शाह म्हणाले. तसेच, आमचं धोरण स्पष्ट असल्याचंही ते म्हणाले. आम्हाला सर्वांसोबत शांततेत राहायचं आहे, पण आमच्या जमिनीवर एक इंचही अतिक्रमण आम्ही होऊ देणार नाही, असं म्हणत अमित शहांनी चीनला चांगलंच खडसावलं आहे.