no images were found
महिमा,संस्कृती,विवान व शंतनुची राज्य स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा उद्योग संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने छत्रपतींचे शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिल्हा संघटनेच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.
मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीनंतर अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीने सहापैकी साडेपाच गुण करून अजिंक्यपदक पटकाविले.कोल्हापूरचा शंतनू पाटील व ,कोल्हापूरचा अरिन कुलकर्णी या दोघांचे समान पाच गुण झाल्यामुळे टायब्रेक गुण सरस ठरलेल्या शंतनूला उपविजेतेपद मिळाले तर अरिनला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.रियार्थ पोद्दार इचलकरंजी,व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर,अभय भोसले जांभळी,वेदांत दिवाण कोल्हापूर व अरीना मोदी कोल्हापूर यांचे प्रत्येकी चार गुण झाले टायब्रेक गुणानुसार त्यांना अनुक्रमे चौथा,पाचवा,सहावा,सातवा व आठवा क्रमांक मिळाला.
मुलींच्या गटात राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरच्या महिमा शिर्के ने सात पैकी साडेसहा गुण करून आरामात अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले.नांदणीच्या संस्कृती सुतारने साडेपाच गुणासह उपविजेतेपद पटकाविले तर नांदणीच्याच सिद्धी बुबणे ने पाच गुणांसह तृतीय स्थान मिळविले.चार गुण मिळवणाऱ्या नियती चोडणकर कोल्हापूर व स्वर्णिका ठाकूर अतिग्रे यांचा टायब्रेक नुसार अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक आला.
बुलढाणा येथे 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2023 दरम्यान होणाऱ्या सतरा राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे
मुले – 1) विवान सोनी इचलकरंजी 2) शंतनू पाटील कोल्हापूर
मुली – महिमा शिर्के कोल्हापूर 2) संस्कृती सुतार इचलकरंजी
आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना राष्ट्रीय पंच आरती मोदी व उत्कर्ष लोमटे व महेश व्यापारी यांचे सहकार्य मिळाले तर राजेंद्र मकोटे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.