no images were found
सांगली जिल्ह्यात देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत
सांगली : देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत 9 एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये होणार आहे. या शर्यतीमध्ये महिंद्रा थार, ट्रॅक्टर्स व मोटारसायकल भव्य अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. रुस्तुम ए हिंद असे या बैलगाडा शर्यतीचे नाव ठेवण्यात आले असून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनीही स्पर्धा आयोजित केली आहे.
संपूर्ण भारतातील बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची आयोजन सांगली जिल्ह्यात करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये (ता. खानापूर) या शर्यतीचा थरार रंगणार असून 7 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
या बैलगाडा शर्यतीचे विशेष आकर्षण म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला १९ लाखांची महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या स्पर्धेत दुसऱ्या व तिसऱ्या नंबरच्या विजेत्यांना ट्रॅक्टर्स देण्यात येणार आहेत. चार, पाच व सहा नंबरवरती शर्यती संपवणाऱ्या विजेत्यांना मोटारसायकली देण्यात येणार आहेत. . बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी बक्षीस असल्याने या बैलगाडी शर्यतीमध्ये सुमारे 200 हून अधिक बैलगाडी शर्यत चालक सहभागी होतील, असा अंदाज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे. या शर्यतीच्या निमित्ताने रक्तदानाचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.