Home सामाजिक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, LPG सिलिंडरच्या दरात कपात

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, LPG सिलिंडरच्या दरात कपात

2 second read
0
0
30

no images were found

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, LPG सिलिंडरच्या दरात कपात

मुंबई : आज पासून, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, तुम्हाला LPG सिलिंडरच्या किमती कमी झाल्याची आनंदाची बातमी ऐकायला मिळाली आहे. वास्तविक, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात.आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या गॅस दरात तब्बल 92 रुपयांची कपात करण्यात आलीय. फक्त व्यावसायिक गॅस सिलंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे.घरगुती 14.2 किलो ग्रॅम सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारने मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 350 रुपयांची वाढ केली होती. आता दर 92 रुपयांनी कमी केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅस 19 किलोग्रॅम वजनाचा असतो.

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस २०४८ रुपयांवर, तर कोलकात्यात २१३२ रुपयांमध्ये विकला जात आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर १९८० रुपये आणि चेन्नईत २१९२.५० रुपये इतके झाले आहेत. घरगुती गॅसच्या किंमती गेल्या महिन्यापासून जैसे थे आहेत. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर ११०३, तर मुंबईत १११२.५ रुपये इतक्या दराने विक्री होत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…