no images were found
दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही’मोदी हटाव, देश बचाओ’चे झळकले पोस्टर्स
आम आदमी पार्टीने पंतप्रधानांच्या विरोधात 11 भाषांमध्ये पोस्टर जारी केले आहेत. पोस्टर्स हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी, मल्याळम, ओरिया, कन्नड, बंगाली, गुजराती, उर्दू आणि तेलुगू भाषांमध्ये तयार करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे पोस्टर्स अभियान सुरू केले आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत असे पोस्टर्स लावले होते. पोस्टर्स लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर दाखल करताना 6 जणांना अटक केली होती. दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाओ’ या आशयाचे फलक लागल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या फलकांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हा चर्चेचा विषय बनला.दरम्यान, , बॅनर कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते. तर यासंदर्भात सायंकाळी येथील आपच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.
मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष एकवटत असतानाच गेल्या एकदोन आठवड्यापूर्वी दिल्ली शहरात आपने ‘मोदी हटाओ, देश बचाओचे’ हजारो फलक लावल्याने खळबळ उडाली होती. असाच प्रकार आज कोल्हापूर शहरात दिसून आला. रातोरात हे फलक लागले असून रंकाळा टॉवर, माऊली चौक, तलवार चौक, हॉकी स्टेडियम आदी चौकात हे फलक लागले आहेत.