Home क्राईम एकतर्फी प्रेमातून, घरात घुसून केली पालकांना मारहाण

एकतर्फी प्रेमातून, घरात घुसून केली पालकांना मारहाण

1 second read
0
0
102

no images were found

एकतर्फी प्रेमातून, घरात घुसून केली पालकांना मारहाण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एकतर्फी छेडछाड आणि धमकावण्याचे प्रकार सुरुच आहेत.याच जाचातून कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता करवीर तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.  ‘माझ्याशी प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही’, असा मोबाइलवर मेसेज पाठवत अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या आणि तिच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण करणाऱ्या तरुणासह नातेवाइकांनी मुलीच्या नागदेववाडी गावात शनिवारी रात्री हा प्रकार घडला.नागदेववाडी येथील सोळा वर्षांच्या मुलीचा संशयित शंतनू निगडे सातत्याने पाठलाग करत असे. शनिवारी परीक्षेला जात असताना या मुलीचा त्याने दुचाकीवरून पाठलाग केला. माझ्यावर प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांचे बरेवाईट करण्याची धमकी देणारे मेसेजही त्याने तिच्या मोबाइलवर पाठवले. हा प्रकार मुलीने घरात सांगताच पालकांनी त्याला जाब विचारला. याचा राग येऊन मुलाकडील नातेवाइकांनी रात्री मुलीच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण केली. याबाबत मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी संशयित शंतनू सर्जेराव निगडे (वय २२) याच्यासह शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे या सर्वांवर घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…