
no images were found
महिलांसोबत डॉक्टरने केले मोठे कांड, महिलांमध्ये संतापाची भावना
या सर्व क्लिप आरोपी डॉक्टरने स्वत: बनवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे आणि जेव्हा त्या भोंदू डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला तेव्हा हे सर्व व्हायरल झाल्या.आरोपींनी लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप साठवून ठेवल्या होत्या. या क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
कोल्हापूर– पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक तितकीच डोक्यात तिडीक निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूड येथील एक बनावट फेरीवाला गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करत होता. ही जाहिरात पाहून आजूबाजूचे अनेक लोक उपचारासाठी येत होते. याचा फायदा घेत त्याने उपचारासाठी आलेल्या महिलांसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. त्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओही बनवले होते. यातील सुमारे ७०ते ८० व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यातील बहुतांश स्थानिक महिला असल्याने संतापाची लाट उसळली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सुमारे 400 महिलांनी पत्र लिहून डॉक्टरवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पिडित महिलांनी केली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यात खळबळ माजली आहे.