
no images were found
महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सातव्या दिवशी मुंबई, नाशिक, परभणी आणि नांदेड संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. मुंबई विद्यापीठाने आजच्या विजयासह आपले उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. शिवाजी विद्यापीठाच्या दोन्ही संघांना आज पराभव पाहावा लागल्याने त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस निराशाजनक ठरला.
आज सकाळचा सामना शिवाजी विद्यापीठ-ब आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात झाला. हा सामना नांदेडने २८ धावांनी जिंकला.
सकाळचा दुसरा सामना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना नाशिकने ८ गडी राखून जिंकला.
दुपारचा पहिला सामना वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्यात झाला. हा सामना परभणी संघाने ७ गडी राखून जिंकला.
दुपारचा दुसरा सामना शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना मुंबईने १८ धावांनी जिंकला.