Home सामाजिक ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१’ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स- द पोलारीस’मध्ये देशभरातील शंभर प्रतिनिधी  हजर

‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१’ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स- द पोलारीस’मध्ये देशभरातील शंभर प्रतिनिधी  हजर

9 second read
0
0
38

no images were found

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स द पोलारीस’मध्ये देशभरातील शंभर प्रतिनिधी  हजर

 

पणजी: ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१’ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स- द पोलारीस’चे आयोजन केले गेले. विविध क्षेत्रांतील तज्ञांबरोबरच देशभरातील तब्बल १०० क्लबमधून रोटेरियन प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते आणि त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये भविष्यकालीन संधी या विषयावर चर्चा केली. २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी ताज रिसॉर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर, गोवा येथे ही परिषद  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला आणि यजमान क्लबचे प्रेसिडेंट विनीत भटनागर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली गेली. या परिषदेचे संपूर्ण उद्दिष्ट हे देशाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध सामाजिक आणि औद्योगिक विषयांवर चर्चा व उपाय हे होते. रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष प्रतिनिधी कॅटरिना कोटसाली पापाडीमीट्रीयु म्हणाल्या, “रोटरीमध्ये आम्ही आमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतो. रोटरी ही एक जादू आहे. रोटरी सर्व अडथळे दूर करते आणि तत्वे व नवीन संधी यांवर भर देते.”

 

रोटरी डिस्ट्रिक्ट3141गव्हर्नर संदीप अगरवाला म्हणाले, “रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर वन हा ११८ वर्षे जुन्या रोटरी इंटरनॅशनलचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. रोटरी इंटरनॅशनलमध्ये २०० देशांमधील  १,४०,००० सदस्य कार्यरत आहेत.संस्था १००बेडने सुसज्ज असे एक व्यवस्था म्हाडाच्या मदतीने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी तयार करत आहे. टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी धर्मशाला म्हणून या संस्थेचा वापर होणार आहे. त्याशिवाय पालघरमध्ये आम्ही एक कम्युनिटी सेंटर तयार करत असून त्या माध्यमातून तब्बल २०,०००कुपोषित  मुलांना तसेच स्तनदा आणि गरोदर  स्त्रियांना मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.” रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे यजमान अध्यक्ष विनीत भटनागर म्हणाले, “स्वार्थाच्या पुढे जाऊन समाजासाठी काम करण्याची जी आमची तत्त्वे आहेत ती प्रेरित करणारी आहेत. यात सातशेहून अधिक रोटेरियन आणि त्यांचे भागीदार सहभागी झाले होते. ही परिषद २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी ताज रिसॉर्ट अँड कॉन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती.”डिस्ट्रिक्टगव्हर्नर अगरवाला यांनी पुढे असे म्हटले की,“रोटरीचा सर्वात महत्त्वाचा भर हा पृथ्वीचे संवर्धन, लहान मुलांचे आरोग्य आणि त्यांच्यावरील उपचार, मुलींचे सबलीकरण, शिक्षण आणि साक्षरता कार्यक्रम, समाज विकास, माता आणि मुलांचे आरोग्य, रोगप्रतिबंधक उपाय व उपचार,  पाणी आणि स्वच्छता तसेच शांतता व तंटानिवारण आणि त्यांची सोडवणूक या गोष्टींवर असणार आहे.”दोन दिवस चाललेल्या आणि खचाखच कार्यक्रमाने भरलेल्या या परिषदेमध्ये चर्चा आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टींचा मिलाफ होता. समाजाप्रती सेवा या उद्दिष्टाने हे आयोजन होते.  

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…