Home मनोरंजन स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

3 second read
0
0
81

no images were found

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण…

 

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. ठरलं तर मग मध्ये अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करणार आहेत.

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही अश्या विचारत असताना पश्या गुपचूप पुजेची तयारी करुन जातो. त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे. यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप गौरीसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे. दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे लक्ष्मीसोबत जयदीप-गौरी गुढीपाडवा साजरा करणार आहेत. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही कानेटकर कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…