Home धार्मिक हिंदूंची संपत्ती हडपण्याचेअमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – हिंदु राष्ट्र-जागृती मागणी

हिंदूंची संपत्ती हडपण्याचेअमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – हिंदु राष्ट्र-जागृती मागणी

3 second read
0
0
186

no images were found

 

हिंदूंची संपत्ती हडपण्याचेअमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – हिंदु राष्ट्र-जागृती मागणी

कोल्हापूर ,हुपरी – वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र या ‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्ती देखील सहज बळकावता येते. हा देशभरात कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, संविधानविरोधी काळा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी 20 मार्च 2023 ला हुपरी येथे नेताजी सुभाषचंद्र चौक येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणेमुळे हिंदू, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध आणि अन्य गैरमुसलमानांची कोणतही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचे अत्यंत भयानक अधिकार मिळाले आहेत. परिणामी भारत सरकारच्या रेल्वे आणि संरक्षण दल यांच्यानंतर देशभरात 8 लाख एकरपेक्षा जास्त भूमीची मालक ‘वक्फ बोर्ड’ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिंदू देवस्थानच्या भूमीवर कुणी कब्जा केला असेल किंवा त्या विकल्या असतील, तर त्याची गय केली जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. गेले वर्षभर हिंदु जनजागृती समिती, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासाठी केलेल्या आंदोलनाचेच हे यश आहे. यापुढील काळातही ‘वक्फ बोर्डा’ने हिंदूंच्या ज्या ज्या भूमी हडप केल्या आहेत त्या परत मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहिल. याचसमवेत ज्यांनी अशा प्रकारे हिंदूंची भूमी हडप केली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’’

आंदोलन झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी आणि हुपरी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, वीर शिवा काशीद प्रतिष्ठानचे श्री. निळकंठ माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. संदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. बापूसाहेब ढेंगे, दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री. नितीन खेमलापुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. उमैश देनै, श्री. राजेश भोजे, मराठा समाज शहरप्रमुख श्री. मोहन वाईंगडे, शिवसेनेचे श्री. विजय जाधव, युवासेना उपशहरप्रमुख श्री. अभिनंदन माणकापुरे, मनसेचे ऋषिकेश साळी, सागर गायकवाड, रेंदाळ येथील सर्वश्री सचिन पाटील, शुभम पाटील, ओमराज माळवदे, पट्टणकोडोली येथील श्री. वीरेंद्र ढेंगळे, श्री. खानदेव होळकर, श्री. निखिल कांबळे, समस्त हिंदू संघटन’चे श्री. रवींद्र गायकवाड, धर्मप्रेमी श्री. प्रशांत साळोखे यांसह समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…