Home राजकीय मनसेच्या वतीने घंटा नाद आंदोलन

मनसेच्या वतीने घंटा नाद आंदोलन

1 second read
0
0
120

no images were found

मनसेच्या वतीने घंटा नाद आंदोलन

कोल्हापूर ,-आर्य क्षत्रिय समाज संस्थेची बेकायदेशीर निवडणूक घेऊन भारतीय संविधानांचा ( सार्वजनिक न्यास नोंदणी अधिनियम 1950 ) भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या धर्मादाय उप आयुक्त प्रदीप चौधरी व निरीक्षक आसिफ शेख यांचे विरुद्ध सबळ पुरावे देऊन सुद्धा आपणास आलेले कारवाईचे विस्मरण शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी स्मरणात आणून देण्यासाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा घेतल्याचे नमूद केले धर्मादाय आयुक्त कार्यालया समक्ष घंटानादाद्वारे मनसे घंटानाद स्मरण आंदोलन करण्यात आले.
सदरहू आंदोलन प्रसंगी येत्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 व तत्सम कायद्यान्वये निरीक्षक आसिफ शेख यांना त्वरित बडतर्फ करावे. तसेच सदरहू संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची न्यायालयीन निष्पक्ष चौकशी करून या कटामध्ये समाविष्ट दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी केली.
उपरोक्त उचित कार्यवाही आपणाकडून न झालेच आपण संगनमताने संविधानाचा भंग करणाऱ्यांना न्यायदेवतेच्या रक्षकांकडून अभय मिळाले असा न्यायव्यवस्थेबद्दल चुकीचा दृष्टिकोन जनतेमध्ये निर्माण होईल व आपणा विरोधात मा. धर्मादाय आयुक्तसो, महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय राज्यपाल सो महाराष्ट्र राज्य, मुख्य निवडणूक आयुक्त नवी दिल्ली, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. विधी व न्याय मंत्री मुंबई यांचेकडे आपल्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . असे प्रतिपादन परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी केले.

धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर भल्या मोठ्या क्रेन वरती भली मोठी घंटा बांधून घंटानाद आंदोलन करणीत आले . भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी आक्रमकपणे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्वेषाने घोषणाबाजी केली.
घोषणांच्या प्रचंड आवाजात दुसऱ्या मजल्यावरील सहाय्यक आयुक्त हेरलेकर यांच्या कार्यालयाच्या बंद असलेल्या दरवाजावर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे धर्मादाय सह आयुक्त विरोधातील आक्रमक आंदोलनाच्या आशयाचे स्मरणपत्र डिजिटल बोर्डाच्या स्वरूपात गेटवर लावण्यात आले.
या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले
, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार, अमित पाटील निलेश धुम्मा यतीन होरणे सागर साळुंखे चंद्रकांत सुकटे अभिजीत राऊत संजय करजगार , Adv.मोतीलाल बुधले इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…