Home मनोरंजन ‘मी सिंगल’ या प्रशांत नाकतींच्या गाण्याला मिळतोय तुफान प्रतिसाद

‘मी सिंगल’ या प्रशांत नाकतींच्या गाण्याला मिळतोय तुफान प्रतिसाद

0 second read
0
0
130

no images were found

मी सिंगलया प्रशांत नाकतींच्या गाण्याला मिळतोय तुफान प्रतिसाद

कोणी एके काळी अशी वेळ होती जेव्हा बघू तिकडे कपल्स असायचे…पण आता असं वाटू लागलंय की सिंगल्सचा जमाना आला आहे… ‘सिंगल आहे आणि मिंगल व्हायची नितांत गरज आहे’, अशा कित्येकांच्या भावना नक्कीच असतील आणि हे अचूक कळलंय ‘मिलिनिअर प्रशांत नाकती’ यांना.

नुकतंच, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक भन्नाट गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले आहे ज्याचे नाव आहे ‘मी सिंगल’. गाण्याच्या शिर्षकावरुनच गाण्याचा विषय अनेकांना कळला आहे आणि तो विषय फारच खोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  “काय मौसम काय झाडी काय डोंगर तरी पण तुमचा भाऊ हाय सिंगल”, या ओळीने ‘मी सिंगल’ गाण्याची सुरुवात होते. सुरुवातच इतकी भारी केली आहे की संपूर्ण गाणं पाहताना एक वेगळीच मजा येते. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या म्युझिकल जोडीने हे गाणे गायले असून या गाण्यात गौरी पवार म्हणजेच बिनधास्त मुलगी, निक शिंदे आणि रितेश कांबळे यांनी टीनएजर्सची भूमिका साकारली आहे जे सिंगल आहेत आणि त्यांना हवी आहे प्रेमळ जोडीदाराची सोबत. त्यांना हवा असणारा त्यांच्या मनासारखा जोडीदार तिघांपैकी कोणाला पहिले भेटला आणि कोण अजूनही जोडीदार शोधतोय हे गाणं पाहिल्यावर तुम्हांला कळेलच.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…