no images were found
मोहित कंबोजांच्या ट्विटनंतर ‘ती‘ केस पुन्हा ओपन होणार
मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण मोहित कंबोज यांची सगळी ट्विटस आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अजित पवार यांच्यावर झाले होते. मात्र, २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्याची केस बंद केली होती. मात्र, मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर आता ही केस पुन्हा ओपन होण्याची दाट शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी तसे संकेत दिले आहे. दरेकर यांनी थेटपणे अजित पवार यांचे नाव घेतले नसले तरी तो नेता कोण आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.