Home राजकीय कसबा – चिंचवडच्या आमदारांची विधानसभेत शपत; नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरानी घेतली शपत

कसबा – चिंचवडच्या आमदारांची विधानसभेत शपत; नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरानी घेतली शपत

0 second read
0
0
43

no images were found

कसबा – चिंचवडच्या आमदारांची विधानसभेत शपत; नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरानी घेतली शपत

पुणे : पुणे पोटनिवडणुकीत कसब्याचे विजयी आमदार रविंद्र धंगेकर आणि चिंचवडच्या भाजपच्या विजयी आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधिमंडळात शपथविधी पार पडला.विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी शपथ घेतली.शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे.

मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ” असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली. आमदार म्हणून जे कर्तव्य हाती घेणार ते निष्ठापूर्व पार पाडणार असल्याचं ते म्हणाले. याचवेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनीही शपथ घेतली. त्यांनीदेखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करुन शपथविधीला सुरुवात केली. दरम्यान, रविंद्र धंगेकर कसब्यातून निवडून आल्यानंतर “हू इज धंगेकर” हा चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराता मारलेला डायलॉग खूप फेमल झाला होता. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून धंगेकर विजयी झाले होते. रविंद्र धंगेकर यांनी 28 वर्षानंतर कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या विजयामुळे कॉंग्रेसला आणि महाविकास आघाडी बळ प्राप्त झालं. तर कसब्याची निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. ही निवडणूक हरल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…