
no images were found
डोंबिवलीत मोठी आग दोन कंपन्या आगीत भस्मसात
डोंबिवली : एमआयडीसीत मध्यरात्री दोन कंपन्यांना आग लागली. संपूर्ण रात्र हे अग्नितांडव सुरु होते. एमआयडीसी फेज 1 भागात रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली.खंबाळपाडा भागानजीक असलेल्या एमआयडीसीत रामसन्स आणि प्राज या दोन कंपन्या आगीत जळून भस्मसात झाल्या.. प्राज टेक्सटाइल कंपनी आणि परफ्यूम बनवणारी रॅमसन्स अशी या कंपन्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली मनपा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या जवळपास 10 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.
आग इतकी भीषण होती की, प्राज टेक्सटाइल कंपनी आणि परफ्यूम बनवणारी रॅमसन्स या दोन्ही कंपन्या आगीत जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे याच कंपनीच्या बाजूला गॅस पंप असल्याने आजूबाजूच्या परिसराला मोठा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून गॅस पंपाला कुलिंग करण्याचे काम सुरु केले होते. आगीच्या ज्वाला पंपापर्यंत पोहोचू न देण्यासाठी आटापिटा सुरू होता. अखेर ही आग नियंत्रणात आल्यानं आणखी होणारा धोका टळला. ही आग रात्री एक वाजण्याच्या सुमारास लागली होती.
आग लागलेल्या कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती आहे. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील कल्याण डोंबिवली मनपा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होती. अखेर आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश मिळालं आहे.