
no images were found
“राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिवसाचे” औचित्य साधून जनजागृतीचे आयोजन
कोल्हापूर -भारतातील औषधनिर्माण शास्त्राचे जनक प्रो. एम. एल. श्राॅफ यांच्या जयंतीनिमित्त फार्मसी कौन्सिलने ६ मार्च हा दिवस “राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिवस” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या दिनाचे औचित्य साधून येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीने उंचगाव परिसरामध्ये जनजागृती व प्रभातफेरीचे आयोजन केले होते. यामध्ये फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी उंचगाव परिसरामध्ये औषधांचे अतिसेवन व त्याचे दुष्परिणाम, औषधांच्या लागणाऱ्या सवयी, योग्य औषधे त्यांची हाताळणी व लहान मुलांच्या औषधांविषयी घ्यावयाची काळजी याविषयी भागातील लोकांशी प्रभात फेरी द्वारे व लोकांशी संवादसाधून जनजागृती केली. हा आगळावेगळा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे विकास अधिकारी डॉ संजय दाभोळे, प्राचार्य डॉ रवींद्र कुंभार, डॉ सचिन पिशवीकर यांचे मार्गदर्शन लाभले सदरची जनजागृती रॅली यशस्वी होण्यासाठी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. सुजित साळोखे, सौ वर्षा शिंदे, सीमा साळोखे, व अर्जुन चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.