Home मनोरंजन ठरलं तर मग आणि मुरांबा मालिकेत पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल

ठरलं तर मग आणि मुरांबा मालिकेत पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल

5 second read
0
0
45

no images were found

 

ठरलं तर मग आणि मुरांबा मालिकेत पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल

रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये होळी आणि धुलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

ठरलं तर मग मालिकेत सायली आणि अर्जुनचा लग्नानंतरचा हा पहिलाच होळी सण. सुभेदार कुटुंबात रितीरिवाजाप्रमाणे होळीची पारंपरिक पूजा होणार आहे. यासोबतच धुलिवंदनाला रंगांची उधळणही होणार आहे. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असलं तरी सायली आणि अर्जुन मात्र आपल्याला कुणी रंग लावणार नाही याची खबरदारी घेताना दिसणार आहेत. इतकी काळजी घेऊनही या दोघांवर अक्षरश: रंगांची बरसात होते. अर्जुन आणि सायली रंगात कसे रंगून गेलेत हे मालिकेच्या येत्या होळी स्पेशल भागांमध्ये पाहायला मिळेल.

मुरांबा मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पहिल्या होळीचा पहिला रंग अक्षयला रमाला लावायचा आहे. रमासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणारा अक्षय योगायोगाने रेवाला पहिला रंग लावतो. रेवा मनातून खुष होते खरी. मात्र माझ्या प्रेमावर फक्त रमाचा हक्क आहे असं अक्षय तिला ठणकावून सांगतो. त्यामुळे मुरांबा मालिकेतला धुलिवंदनाचा सण खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयसाठी खास ठरणार आहे.

ठरलं तर मग आणि मुरांबा प्रमाणेच ठिपक्यांची रांगोळी, लग्नाची बेडी, अबोली आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतही होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे होळी विशेष भाग.

 

 

 

 

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…